Top News पुणे महाराष्ट्र

‘तुम्हाला मला काही द्यायचं असेल तर….’; रतन टाटांनी आपल्या कामगारांकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा

पुणे |  भारतातील नामवंत आणि प्रसिद्ध उद्योजक टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटांनी त्यांच्या कामगार संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या चाळीस जणांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यावेळी टाटांनी संवाद साधताना त्यांच्याकडे एक इच्छा व्यक्त केली.

मला तुमचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, अशा शब्दात टाटांनी कृतज्ञता व्यक्त केली. मला आणखी काही द्यायचे असेलच तर भारतीय बाजारपेठेत कंपनीला सर्वोच्च स्थान मिळावून द्या, अशी इच्छा रतन टाटांनी व्यक्त केली.

व्यवस्थापन आणि कामगार संघटना एकत्र असल्यास कोणतेही उद्दिष्ट साध्य करू शकतात. याच एकजुटीच्या आणि निष्ठेच्या जोरावर टाटा मोटर्सला भारतीय बाजारपेठेत सर्वोच्च स्थान मिळावं, असं टाटा म्हणाले.

दरम्यान, रतन टाटा पुण्यात आपल्या प्रकल्पातील ‘लेक हाउस’ येथे गेल्या काही दिवसांपासून मुक्कामी आहेत. मंगळवारी शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

थोडक्यात बातम्या-

हिंदू महासभेने सुरू केलेली गोडसे ज्ञानशाळा दोन दिवसांतच बंद, प्रशासनाने ठोकले टाळे

सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या ‘या’ गावांना निवडणूक आयोगाचा झटका!

ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीकडून अटक!

‘एकदा सत्य बाहेर आलं की…’; धनंजय मुंडे प्रकरणावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

‘शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर…’; चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या