सध्या भारतीय लोक चारचाकी गाडी घेताना सुरक्षेच्या बाबतीत जागरूक झाले आहेत. टाटांच्या वाहन सुरक्षेच्या बाबतीत टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा बाजारात अव्वल स्थानावर आहेत.
चारचाकी वाहनांचे मालक पुढे येऊन त्यांच्या कार सुरक्षेविषयी आणि वैयक्तिक अडचणी सांगत आहेत. त्यांच्या कारच्या बाबतीत सुरक्षेविषयी कोणत्या गोष्टी कमी आहेत आणि कारमध्ये कोणत्या गोष्टींची कमी आहे म्हणजे संबंधित कंपनी ते मॉडिफिकेशन करेल. मात्र अशातच टाटा कारच्या एका मालकाने आपण मरणाच्या दारातून कशाप्रकारे माघारी परतलो याचा थरारक अनुभव सांगितला आहे.
सत्य प्रकाश रेड्डी असं कार मालकाचं नाव आहे. त्यांनी ऑक्टोंबर 2020 साली टाटा टियागो ही कार खरेदी केली होती. टाटाच्या या कारने त्यांना जीवदान दिलं. सत्य प्रकाश हे आपल्या मित्रांसोबत प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला होता.
रेड्डी अहमदाबादवरून हैदरबादला चालले होते. तेव्हा रेड्डी स्वत: गाडी चालवत होते. मात्र कार चालवताना त्यांचं लक्ष दुसरीकडेच होतं आणि अचानक समोर एक मोठा खड्डा आला रेड्डींनी खड्डा चुकवण्यासाठी गाडीचं स्टेरिंग बाजूला फिरवलं त्यावेळी गाडी जवळजवळ 100 च्या आसपास होतं.
रेड्डींचा गाडीवरचा ताबा पुर्णपणे सुटला होता तेव्हा टियागोने चार रोलओव्हर केलं. यामध्ये चालकाच्या बाजूने कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. अपघात झाल्यावर स्थानिक लोक जेव्हा पाहायला आलीत तेव्हा रेड्डी बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांच्या उजव्या हाताला जखम झाली होती तर त्यांच्या दोन मित्रांना कोणतीही जखम झाली नव्हती.
दरम्यान, सत्य प्रकाश रेड्डी या अपघातानंतर टाटा टियागोच्या सुरक्षेने इतके प्रभावित झाले की त्यांनी आणखी एक टाटा टियागो खरेदी केली. रेड्डींनी आपले प्राण वाचल्यावर टाटा गाडीचे आभार मानले आहेत.
थोडक्यात बातम्या-
टिकटाॅक युजर्ससाठी खूशखबर, भारतात टिकटाॅक पुन्हा होणार सुरू??
…मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल- देवेंद्र फडणवीस
शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला, म्हणाले…
मोदींच्या कुटुंबातील व्यक्तीनं केलेल्या आरोपानं खळबळ
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ‘तो’ मुलगा गायब!
पुण्यातील ‘या’ रस्त्यावर 7 किलोमीटर लांबीचा दुमजली उड्डाणपूल होणार!