कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही पगार देणार, घर आणि मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च टाटा उचलणार
नवी दिल्ली | टाटा स्टील कंपनीने आपल्या कर्मचार्यांसाठी मोठी घोषणा केली. कोरोना संकटाच्या वेळीही कर्मचारी सातत्याने कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यावर असताना अनेक कर्मचार्यांचे मृत्यूही झाले. अशात कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे सेवा पूर्ण होईपर्यंत कुटुंबास संपूर्ण वेतन दिलं जाणार आहे.
टाटा स्टील कंपनीकडून निवास आणि वैद्यकीय सुविधादेखील देण्यात येणार आहे. इतकंच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास टाटा स्टील 60 वर्षे त्यांच्या अवलंबितांना संपूर्ण वेतन देईल. पगाराशिवाय कर्मचार्यांच्या कुटुंबांनाही क्वार्टर आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील. तसेच जर कर्तव्य बजावताना कंपनीत कामगार मृत्युमुखी पडला तर त्यांच्या मुलांच्या पदवीचा संपूर्ण खर्च कंपनी व्यवस्थापन उचलेल, असं टाटा स्टील व्यवस्थापनाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
कंपनी आपल्या कर्मचार्यांना सामाजिक सुरक्षेच्या मदतीसाठी सर्वतोपरी पुढाकार घेत आहे, जेणेकरून कंपनीत कार्यरत प्रत्येक कर्मचार्यांचे भविष्य उत्तम होईल, असंही कंपनीने म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
“वादळ 4 तास थांबलं, मुख्यमंत्री 3 तासही थांबले नाही”
कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट
टॅक्सी चालकाने भाडं नाकारलं अन् त्याच्यासोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; रिकव्हरी रेट 92.12 टक्यांवर
Comments are closed.