बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नेक्सॉनच्या यशानंतर येतेय टाटांची ‘ही’ इलेक्ट्रीक गाडी, फक्त 21 हजार रुपये…

मुंबई | 21 व्या शतकात आपण जसजसे पुढे जात आहोत तसं तसं आपल्या राहण्याच्या पद्धती आणि राहणीमानाची साधणं ही बदलावी लागत आहेत. वाढणारं प्रदुषण ही सुद्धा एक महत्वाची समस्या बनली आहे. आपण राहताना आपल्या गरजा या अमर्याद असतात. वाहन हे त्या गरजेतलं एक महत्वाचं साधन बनलं आहे. चारचाकी कार ही एक गरज बनली आहे.

वातावरणाला पोषक असं व आपल्या खिशाला परवडेल अशी वाहन घेणं ही काळाची आणि आपली स्वत: ची गरज आहे. इलेक्ट्रीक वाहन धोरण हे सुद्धा याचाच एक भाग आहे. खनिज तेल ही नष्ट होणारी संपत्ती आहे. याचा योग्य वापर करणं हे येणाऱ्या काळासाठी गरजेचं बनलं आहे. वेगवेगळ्या कपंनी या बाजारात इलेक्ट्रीक वाहन घेऊन येत आहेत.

टाटा मोटर्सने नवीन टिगोर कार बाजारात आणली आहे. इलेक्ट्रीक पद्धतीच्या या कारमध्ये खूपसारे नवीन फिचर असणार आहेत. कोणत्याही अधिकृत दुकानदाराकडे याबाबत आपण नोंदणी करू शकता. 21 हजार रुपये भरून आपण ही गाडी बुक करु शकता. टिगोर ईव्ही ही गाडी 31 ऑगस्टपासून बाजारात उपलब्ध असेल.

50 केडब्लु चार्जरच्या मदतीने आपण ही गाडी 1 तासात चार्ज करू शकता. एकदा चार्जींग केल्यावर हा गाडी 300 कि.मी चालू शकते. या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी पुर्णपणे पर्यावरणपूरक आहे. गाडीच्या बॅटरीची वाॅरंटी ही 8 वर्षांची असेल. आपण ही गाडी घरी चार्ज केली तर ही गाडी 8.5 तासात 80 टक्के चार्ज होते. खूप साऱ्या विशेष सुविधांचा समावेश या गाडीमध्ये आहे.

थोडक्यात बातम्या

बैल विकताना मालक रडला, बैलाच्या डोळ्यातही पाणी, पाहा निशब्द करणारा व्हिडीओ

राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक नसणार?, मिळू शकते ‘ही’ मोठी जबाबदारी

येत्या 24 तासात ‘या’ भागात मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! लोकलने आता सर्वांना प्रवास करता येणार

पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनी महिलेसोबत घडलं असं काही, नीचपणाचा कळस!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More