टाटाची ‘ही’ नवी ई-कार ठरणार गरिबांसाठी वरदान

नवी दिल्ली | कारच्या भरमसाठ किमतीमुळे ती घेऊ न शकणाऱ्यांसाठी एक कार बाजारात आली होती. आकाराने लहान असून देखील टाटाची (Tata) नॅनो कार सगळ्यांच्या पसंतीस उतरली होती. जी अगदी कमी कालावधीत लोकप्रिय(Popular) झाली होती.

वाढत्या महागाईमुळे आणि तेलाच्या वाढत्या किमतीमुळे हल्ली अनेकजण ई-कारचाच विचार करतात. त्यामुळे ग्राहकांची ही पसंत ओळखून टाटाने ई-कार मध्ये उडी मारलीच आहे. मात्र सर्वांची लाडकी नॅनो (Nano) ई-कारच्या रूपात लवकरच बाजारात येणार आहे.

टाटाची ही नवीन नॅनो ई-कार सगळ्यात स्वस्त किमतीत असणार आहे. 2008 ला टाटा यांची पेट्रोल(Petrol)वर चालणारी ही कार पहिल्यांदा बाजारात आली होती. त्या कारला गरिबांची कार देखील म्हणलं जाऊ लागलं होत. कारण ती फार स्वस्त होती.

2018 ला मात्र कारच्या मागणीत घट झाल्याने टाटाने त्यांची नॅनो कार बंद केली होती. मात्र आता वाढत्या ई-कारच्या किमती पाहता कंपनीने पुन्हा एकदा नॅनो नव्या रुपात आणण्याचा विचार केला आहे. बाजारात येणारी टाटामोटार्स ची ई नॅनो कार ही नव्या आकर्षक डिझाईनसह बनवली जाणार आहे. त्यातील फिचर्स (Features) देखील अपडेट केले जाणार आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक असा केबिन स्पेस या नॅनो ई-कारला मिळू शकतो.

या कारमध्ये फास्ट चार्जिंगचा पर्याय असेल. 72 व्होल्ट क्षमतेची बॅटरी असणार आहे. याशिवाय या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटार (Electric motor) देखील असणार आहे. ही कार चार्ज केल्यानंतर 150 ते 200 मीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.

65 ते 85 इतका टाॅप स्पीड ही कार देऊ शकते. टाटा नॅनोच्या स्पीडच्या आलेल्या रिपोर्टबद्दल सांगायचं झाल्यास ही कार 7.3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग देऊ शकते. आलेल्या रिपोर्टनुसार ही कार सगळ्यात स्वस्त कार असणार आहे. टाटाच्या या नॅनो कारची किंमत 3 ते 5 लाख रुपये असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More