महाराष्ट्र मुंबई

महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे

मुंबई | राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. त्यामुळं महसुलाचा ओघ सुरू करण्याचा विचार आता सरकारनं करायला हवा, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यामध्ये महसुलाचा ओघ सुरु करण्याच्या दृष्टीने राज्यातील ‘वाईन शॉप्स’ सुरु करायला काय हरकत आहे? असा सवाल केला आहे.

दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा माझ्या म्हणण्याचा उद्देश नाही. मात्र महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

टाळेबंदी आणखी किती दिवस चालेल याची खात्री नाही. त्यामुळं राज्याच्या महसुलासाठी सरकारनं वाइन शॉप उघडण्याचा विचार करावा, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

 

ट्रेंडिंग बातम्या-

गेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू

अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा; दिले पंचनामे करण्याचे आदेश

महत्वाच्या बातम्या-

कोरोना इतक्यात जग सोडून जाणार नाही, आपल्याला आणखी भरपूर मोठा पल्ला गाठायचाय- WHO

सुप्रिया पिळगावकर यांनी शेअर केला विशीतला फोटो, आताच्या अभिनेत्रींना लाजवेल असं सौंदर्य

बारामतीत भिलवाडा पॅटर्न मग जामखेडला का नाही?; राम शिंदे यांचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या