बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खूप अभ्यास केलाय; आम्हा डॉक्टरांपेक्षाही त्यांना कोरोनाचं जास्त ज्ञान”

मुंबई | प्रसिद्ध डॉ. तात्याराव लहाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळेच आपण कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लक्षवेधी कामगिरी करू शकलो, असं डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा इतका अभ्यास केला आहे की आम्हा डॉक्टरांपेक्षा त्यांचं कोरोनाचं ज्ञान अधिक आहे, असं तात्याराव लहाने म्हणाले आहेत. ते लोकमतने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रोज 2 लाख टेस्ट करू शकू एवढ्या लॅब आज महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोना मृत्यूदर 38 टक्क्यांवरून आज अडीच टक्क्यांच्याही खाली आला आहे. हे सरकारच्या सहकार्यामुळेच शक्य झालं, असं म्हणत तात्याराव लहाने यांनी राज्य सरकार आणि उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

यावेळी कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागलेत. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे. हा आजार आणखी वर्षभर आपल्यासोबत राहणार आहे. म्हणून मास्क लावावा लागणार आहे, असंही लहानेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहेत. गेल्या सहा दिवसांत राज्यात एक लाख नऊ हजारहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर अजूनही लोकांनी काळजी घ्यावी, नियम पाळावेत ही कळकळीची विनंती आहे. अन्यथा, पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून चक्क संजय राठोड यांच्याच गाडीपुढे झोपला युवक!

आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला पहिलाच चेंडू, अन् दिग्गज आर्चरला ठोकला षटकार; सूर्यकुमार म्हणतो…

मोठी बातमी! मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी मिळाला आणखी एक मृतदेह!

मासिक पाळी दरम्यान तरुणीच्या डोळ्यातून वाहू लागलं रक्त, वाचा काय आहे प्रकरण

वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते- मुंबई उच्च न्यायालय

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More