बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याबाबत तात्याराव लहानेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले..

मुंबई | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं असून त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार?, पहिल्याप्रमाणे कधी सर्व सुरळीत होणार?, असे प्रश्व लोकांना पडले आहेत. यावर राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलासादायक माहिती दिली आहे.

जगातील इतर देशांच्या अभ्यासानुसार कोरोना 90 दिवसांनी कमी होत असतो. त्यामुळे 15 मे ते 25 मे च्या दरम्यान कमी होताना दिसेल, असं तात्याराव लहाने यांनी सांगितलं आहे.  तर दुसऱ्या लाटेत  तरूण लोक जास्त प्रमाणात संक्रमित दिसून येत आहेत. वाढता धोका लक्षात घेता आता 18 वर्षापर्यंत लसीकरण होणार आहे, त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणार असल्याचं लहाने म्हणाले.

देशात 5 नव्हे तर 1 हजार स्ट्रेन आढळले आहेत. आपल्याला फक्त हे बघायचं आहे की हा स्ट्रेन जास्त संसर्ग वाढवणारा आहे का?, तो शरीरावर जास्त परिणाम करणारा आहे का?, असे स्ट्रेन प्रत्येक 3 महिन्यांनी आढळतात. त्यामुळे या नव्या स्ट्रेनचा अभ्यास सध्या सुरू ठेवला असल्याचं लहाने यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, साथीच्या रोगांमध्ये व्हायरसची ताकद सतत वाढत असते. व्हायरस आपल्यात बदल करत असतो. यामुळे कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे आज सांगू शकत नाही. कितीही लाटा आल्या तरीही महाराष्ट्र खंबीर आहे. पुरेशी तयारी आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपण तयारी केली आहे, असं लहाने यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

भारतात कोरोना स्थितीचा वाईट काळ येणं अजून बाकी आहे- सुंदर पिचाई

“बीसीसीआयने 700-800 कोटींची मदत करावी, देशाला उपकाराची परतफेड करण्याची वेळ”

अवघ्या 32 वर्षीय IRS अधिकारी अनंत तांबेंचं कोरोनानं निधन!

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

ममता बॅनर्जी यांची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड; 5 मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More