टॅक्सी एजंटने अडवली खासदार सुप्रिया सुळेंची वाट!

मुंबई :  मुंबईतल्या दादर रेल्वे स्टेशनवर टॅक्सीवाल्याकडून आलेल्या विचित्र अनुभवाविषयी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे दाद मागितली आहे.

दादर रेल्वे स्टेशनवर टॅक्सी एजंटने सुप्रिया सुळे यांची वाट अडवली. याचविषयीची तक्रार त्यांनी ट्वीट करून रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.

कुलजीत सिंह मल्होत्रा असं स्वतःचं नाव सांगणारा माणूस ट्रेनमध्ये शिरला. टॅक्सी सेवेसाठी तो दलाली करत होता. दोन वेळा नकार देऊनही त्याने माझा रस्ता अडवला, असं त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. त्याचा मुजोरीपणा एवढा होता की एवढा सगळा प्रकार घडूनही निर्लज्जपणे तो फोटोसाठी पोझही देत होता, असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, रेल्वेमंत्र्यांनी कृपया या प्रकरणात लक्ष घालावं, म्हणजे प्रवाशांना असा अनुभव पुन्हा येता कामा नये. जर दलाली कायदेशीर असेल, तर रेल्वे स्थानकं, विमानतळ यांच्यावर दलालीला परवानगी नसावी. केवळ नेमलेल्या टॅक्सी स्टँडवरच एजंटना संमती द्यावी, अशी विनंती त्यांनी रेल्वेमंत्र्यांना केली आहे.

महत्वाच्या  बातम्या-