मोदींनी चहा विकलेलं दुकान पर्यटनस्थळ म्हणून घोषित होणार

अहमदाबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकेकाळी चहा विकलेलं गुजरातच्या वडनगरमधील दुकान पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात येणार आहे. पुरातत्व आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतंच यासंदर्भात सर्वेक्षण केलंय.

वडनगर रेल्वे स्थानकाच्या फलाटावर हे चहाचं दुकान आहे. तसेच वडनगर हे मोदींचं जन्मगाव आहे, त्यामुळे या गावाला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी अनेकदा आपण लहानपणी चहा विकल्याचा उल्लेख केला होता.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या