बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मोदींना धन्यवाद देण्यासाठी शेजाऱ्यांना चहा पाजा’; रावसाहेब दानवेंनी दिला अजब सल्ला

जालना | वादग्रस्त वक्तव्य आणि आपल्या गावरान भाषेच्या वेगळ्या शैलीमुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले नेते म्हणजे केंद्रीय रेल्वे, कोळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे (raosaheb Danve ). अशातच ते पुन्हा एकदा त्यांच्या अनोख्या सल्ल्यामुळे चर्चेत आले आहेत.

जालना येथील ठेवीदारांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात धनादेश देण्यात आले, यावेळी दानवेंनी आपल्या अनोख्या शैलीत भाषण केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (pm narendra modi) धन्यवाद देण्यासाठी बँक ठेवीदारांना चक्क शेजाऱ्यांना चहा (tea) पाजण्याचा अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या सल्ल्याची एकच चर्चा होत आहे.

तुमचे बुडालेले पैसे मिळाल्याबद्दल घरी जाताच शेजाऱ्यांना आणि मित्र मंडळींना चहा पाजून मोदींचे आभार माना, असा अजब सल्ला दानवेंनी भाषणातून दिला.

दरम्यान, राजधानी दिल्ली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना जिल्ह्यातील अर्जून जाधव व सत्यभामा जाधव या ठेवीदारांना विम्याच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावर बोलताना दानवे म्हणाले की, मोदींना गरिबांची जाण आहे कारण त्यांच्या जन्मही गरिबांच्या पोटी झाला आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘त्या’ गटारगंगेतून मुंबईला बाहेर काढायचंय; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

“म्हाडा पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे”

चिंताजनक! आता ‘या’ जिल्ह्यात आढळला Omicronचा पहिला रुग्ण

महाराष्ट्र कोरोना अपडेट, जाणून घ्या आजची आकडेवारी

नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, म्हणाले ‘बँक बुडाल्यास ठेवीदारांना…’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More