बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार यांना सोडून जाणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवा”

अकोला | अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायत निवडणूक प्रकिया सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचाली पहायला मिळत आहेत. त्यामुळे सगळे राजकीय नेते प्रचारात व्यस्थ असलेले पहायला मिळत आहे. अशातच पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही प्रचारसभा घेतली होती. यावेळी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

हसन मुश्रीफ यांनी नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या प्रचार सभेत गेल्या पाच वर्षात इतका निधी मिळाला नाही तेवढा निधी या दोन वर्षात दिला असून अकोले शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे.

शरद पवार यांनी एका माणसाला सर्व पदे दिली मात्र त्यांनी शेवटी शरद पवार यांना सोडून दिले. त्यांना धडा शिकवा. त्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांचा पराभव करा, असंही यावेळी हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यालाही हात घातला. ओबीसी आरक्षण न मिळण्यास भाजप जबाबदार आहे, तरीही आम्ही ओबीसी आरक्षण मिळवून देणारच असं आश्वासन मुश्रीफ यांनी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! Omicronच्या धास्तीनं ‘या’ ठिकाणी लाॅकडाऊनची घोषणा

Omicronच्या भीतीनं परिक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन?; उच्च शिक्षणमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

‘उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार’; नवाब मलिकांचा खबळजनक दावा

चिंताजनक! Omicron संदर्भात एम्सनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा पक्ष या देशात ठेवायचा की नाही…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More