महाराष्ट्र मुंबई

आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न!

मुंबई | मुंबईतील मंत्रालय परिसरातील आकाशवाणी आमदार निवसाच्या एका इमारतीवर चढून शिक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

घटनास्थळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोल यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व पोलिसांसह अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी जमले. या शिक्षकाची सर्वोतोपरी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

या शिक्षकाचं नाव गजानन खैरे आहे. कोरोना काळात आम्हाला काम मिळालं नाही, शिवाय पगार देखील मिळालेला नाही. कोणीही आमच्याकडे लक्ष देत नाही. आता मी खूप थकलेलो आहे. जिवंत असताना मला न्याय मिळाला नाही, किमान मेल्यावर तरी मला न्याय मिळू द्या, असं खैरेेंचं म्हणणं आहे.

मी या विषयाबद्दल एक बैठक बोलावली होती. परंतु करोना काळात निर्णय झाले नाही. तुम्ही खाली उतरा उद्याच्या उद्या तोडगा काढतो. केवळ तुम्हीच नाहीतर अन्य शिक्षकांना देखील आपण मदत करू, असं म्हणत नाना पटोलेंनी या शिक्षकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मला सुशांतच्या नावाचा गैरवापर करुन मिळणारी प्रसिद्धी नकोय- निया शर्मा

‘मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व संभाजीराजेंनी करावं’; ‘या’ शिवसेना खासदाराची मागणी

दिलदार माणूस! कोरोनाच्या काळातही रतन टाटांनी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केला कोट्यवधींचा बोनस

…तर एटीएममधून पैसे काढताना ओटीपीची आवश्यकता, SBI चा नवा नियम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या