बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला गावकऱ्यांनी दिला चोप

यवतमाळ | शाळा हे सुसंस्कृत समाज घडवण्याचं सर्वात मोठं माध्यम आहे. शाळेंच्या माध्यमातून वैभवशाली देश घडवण्याची स्वप्न आपला देश पाहतोय. शिक्षकांच्या खांद्यावर शाळेत शिकणाऱ्या महासत्ता भारताच्या उज्वल भविष्याला घडवण्याची जबाबदारी असते. पण हा खांदाच निखळला तर काय होईल.

यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथील शाळेतील एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी गोष्ट केली आहे. आपल्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करुन त्रास दिला आहे. अरुण राठोड असं या नराधमाचं नाव आहे. धक्कादायक बाब तर ही आहे की या शिक्षकाला आदर्श पुरस्कार भेटला आहे. पण याची वाईट नजर आपल्याच विद्यार्थीनीवर पडली.

अरूण राठोड याने पीडित विद्यार्थिनीला चांगले गुण मिळवून देण्याचं आमिष दाखवलं होतं. गेल्या महिन्याभरापासून तो पीडित विद्यार्थिनीवर अत्याचार करत होता. अखेर ही गोष्ट गावातील तरुणांना कळाली. त्यानंतर पीडितेचे नातेवाईक आणि तरुणांनी शाळेत जाऊन अरुण राठोडला जाब विचारला आणि चांगलाच चोप दिला. गावकऱ्यांनी या शिक्षकाला कपडे फाटेपर्यंत मार दिला आहे.

या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्या शिक्षकाला ताब्यात घेतलं. त्याला रुग्णालयात दाखवून नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

थोडक्यात बातम्या

भररस्त्यात महिलेने कारचालकाला केली बॅटने मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

खुशखबर! आता मोफत गॅस कनेक्शन मिळणार, वाचा काय आहेत नियम?

‘न्यूड सीन दिले नाही म्हणून माझं करिअर संपलं’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

पीएफ खातेदारांनो तात्काळ ‘हे’ काम करा, अन्यथा होईल मोठं नुकसान

‘पुढील दोन महिने धोक्याचे’; कोवीड टास्क फोर्सनं राज्याला दिला गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More