बेळगाव | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली असताना बेळगाव जिल्ह्यातील शिवापूर गावातील एका शिक्षिकेने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली.
‘पाकिस्तान जिंदाबाद’ असा मजकूर शिक्षिकेने व्हॉट्स अॅपवर व्हायरल केला. त्यामुळे मुरगोड पोलिसांनी शनिवारी त्या शिक्षिकेला अटक केली.
संतप्त जमावाने त्या शिक्षिकेच्या घरावर दगडफेक केली आणि घर जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर स्थानिकांनी यरगट्टी रोडवर रास्ता रोको करत निदर्शने केली.
दरम्यान, त्या शिक्षिकेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
–पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहिराणीतून केली भाषणाला सुरवात
–तुम्हाला मोठी किंमत चुकवावी लागेल; इराणही पाकविरोधात आक्रमक
–कंगाल पाकिस्तानपुढे शरणागती कशाला? प्रकाश आंबेडकरांचा सवाल
–पवारांचा कार्यकर्त्यांवर विश्वास नाही म्हणून घरातच उमेदवारी देत सुटलेत”
-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोकाट; पत्रकार पत्नीची बदनामी केल्यामुळे गुन्हा दाखल
Comments are closed.