बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिक्षक असलेल्या पतीने पत्नीचा आणि 13 महिन्यांच्या मुलाचा गळा चिरुन केला खून; कारण अत्यंत धक्कादायक

जयपूर | राजस्थानमधील जयपूर येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका पतीने आपल्याच पत्नीचा आणि 13 महिन्यांच्या मुलाचा गळा चिरुन खून केल्याचं उघडकीस आलं आहे. एवढंच नाही तर यानंतर आरोपीने जे केलं ते अत्यंत धक्कादायक आहे. संबंधित आरोपीचं नाव गिरिराज मिना असं आहे. आरोपी हा उच्च शिक्षीत असून पेशाने शिक्षक आहे.

गिरिराज यांच्या मृत पत्नीचं नाव समिता मिना असं आहे. समिता यांच्या मामाच्या मुलाचं लग्न जवळ आलं होतं. या कारणामुळे तिच्या घरातील अनेक लोक तिला फोन करुन लवकर येण्यास सांगत हेते. मात्र गिरिराज समिता यांना लग्नाला जाण्यास नकार देत होता. यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाला. हा वाद काही दिवसांनंतर इतक्या टोकाला पोचला की गिरिराज याने आपल्या 13 वर्षांच्या चिमुकल्याचा आणि पत्नीची गळा चिरुन हत्या केली.

आरोपी गिरिराज यांनी पत्नी आणि मुलाचा खून केल्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपी गिरिराज यांची पत्नी देखील शिक्षीका होत्या. या संपुर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आता या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, घरातल्यांनी वारंवार समिता यांना फोन केला. मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे घरातल्यांनी आरोपी पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा प्रतिसाद न मिळाल्यामुळे संबंधित दाम्पत्याच्या घर मालकाशी संवाद साधला. त्यानंतर हा प्रकार उघड झाला.

थोडक्यात बातम्या-

‘परिस्थिती गंभीर होत चाललीये, आतातरी काहीतरी करा’; 100 शास्त्रज्ञांचं मोदींना पत्र

कोरोना झाला असतानाही रोहित सरदाना करत होते ‘ही’ महत्त्वाची मदत, शेवटचे तीन ट्विट चर्चेत!

“आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?”

मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी कोरोनामुळे निधन

“कोरोना तर संपला” असं म्हणणाऱ्या भाजप आमदाराचं कोरोनाने निधन

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More