बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजकीय व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे प्रसिद्ध ZP शाळा वाबळेवाडीच्या शिक्षकांचे राजीनामे

शिरूर | शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीतील प्रसिद्ध जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रय वारे यांनी मुख्याध्यापक पद आणि शासकीय सेवेचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शाळेसाठी नवीन विचार आणि अध्यापनाशिवाय इतर कुठल्याचं विषयात संबंध नसताना शाळा व्यवस्थेशिवाय बाहेरील व्यक्तिंकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ वारे यांनी आपल्या सरकारी सेवेचा राजीनामा दिल्याचं कळतंय.

वाबेवाडीतील ग्रामस्थांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. वारे यांच्या समवेत त्यांचे सहकारी शिक्षक एकनाथ खैरे, केंदुर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जयसिंग नऱ्हे यांनीही मुख्याध्यापकासह शासकीय सेवेचा आज शिरूर पंचायत समिती कार्यालयात राजीनामा सादर केला.

वाबळेवाडी शाळा पालकांकडून 5 ते 25 हजारांच्या देणग्या घेत असल्याची तक्रार आल्याने प्रशासनाने शाळेकडून माहिती मागवली होती. ज्यांच्या पाल्यांना या शाळेत प्रवेश मिळाला नाही अशा काहींनी जिल्हा परिषदेकडे शाळेच्या तक्रारी केल्या.

शाळेतील एकाही पालकाची तक्रार नसताना बाहेरील व्यक्तीच्या तक्रारीवरून वाबळेवाडीत गोंधळ सुरू झाला आहे. वारे आणि इतर शिक्षकांना ओढून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला. हा प्रकार सहन न झाल्याने वारेंनी राजीनामा दिला.

थोडक्यात बातम्या- 

“संवेदनाहीन, निबर राज्यकर्ते महाराष्ट्राला लाभणं हे राज्याचं दुर्दैव”

‘ती व्यक्ती दुसरी कोणी नसून मी होते’; शर्लिन चोप्राचा खळबळजनक खुलासा

“आपापली मुलंबाळं, जनावरं आणि महत्त्वाच्या वस्तू घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा”

“हातात हात देऊन काम केलं पाहिजे ठिके पण सरकारचा हात तरी दिसला पाहिजे ना”

‘पूरग्रस्तांना पिण्याचं पाणी आणि अन्न पुरवा’; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना फोन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More