बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी…., राज्यपालांची महत्त्वाची सूचना

मुंबई |  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नैराश्याचे वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थी व युवक यांच्यापुढे आव्हानात्मक परिस्थिती उभी आहे. या परिस्थितीतून युवकांना बाहेर काढण्यासाठी व समाजाला जागरूक करण्यासाठी शिक्षकांना समुपदेशक म्हणून भूमिका पार पाडावी लागेल. देशाला प्रगतीच्या वाटेने पुढे न्यायचे असेल तर ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ या मानसिकतेतून बाहेर पडून ‘खबरदारी घ्या आणि आनंदी राहून कार्य करा हा मूलमंत्र अंगिकारावा लागेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास विभागाने महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या ‘मनोवैज्ञानिक समुपदेशन प्रशिक्षण’ या ७ दिवसांच्या ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन राज्यपालांनी दृकश्राव्य माध्यमातून आज राजभवन, मुंबई येथून केले, त्यावेळी ते बोलत होते.

नैराश्य किंवा विषाद ही मनुष्यात निर्माण होणारी एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, शेतकरी आणि राजकारणी यांसह सर्वांना कधी ना कधी निराशा येत असते. मात्र ही प्रवृत्ती अभ्यास, निष्ठा व समर्पण भावनेने घालविता येते असे सांगून भगवदगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या मार्गदर्शनाने घोर नैराश्यातून बाहेर काढून कर्तव्य करण्याला प्रवृत्त केले, असे त्यांनी सांगितले.

लोकमान्य टिळकांनी देखील तुरुंगामध्ये राहून निराश न होता गीता रहस्याची निर्मिती केली, याचे स्मरण राज्यपालांनी दिले. सोक्रेटस, प्लेटो, कॉनफुशियस, ताओ तसेच संतसाहित्याच्या  वाचनाने नैराश्य दूर होण्याला मदत होऊ शकते असे राज्यपालांनी सांगितले.

Shree

भारतातील युवकांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांचा थोर वारसा लाभला आहे, त्यामुळे युवकांनी निर्भय होऊन देशाला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

“आमच्या नेत्यांमध्ये दोन काय, चार बायका सांभाळण्याची ताकद”

अण्णाभाऊ साठे यांचं मुंबईत स्मारक उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

राजू शेट्टी सरकारी आंदोलक, त्यांची लुटूपुटूची लढाई सरकार वाचवण्यासाठी- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More