…म्हणून या शाळेत शिक्षक हेल्मेट घालून शिकवतात!

हैदराबाद | शाळेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे तेलंगणातील एका शाळेत शिक्षकांनी हेल्मेट घालून विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केलीय. हैदराबादजवळच्या मेडक जिल्ह्यातील चिन्ना शंकरमपेटमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार सुरुय. 

२१९ विद्यार्थिनी आणि ६६४ विद्यार्थी असलेल्या या शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. अनेकदा शाळेचा काही भाग कोसळून विद्यार्थ्यांना इजा देखील पोहोचलीय.

दरम्यान, प्रशासनाचं शाळेच्या इमारतीकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी हे अनोखं आंदोलन पुकारलंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या