बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ कारणामुळे रोहित शर्माला वगळलं!

नवी दिल्ली | आयपीएलची स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी अनेक नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

मात्र, या महत्त्वात्या दौऱ्यात मुंबईचा रोहित शर्माला स्थान देण्यात आलेलं नाही. मुख्य म्हणजे रोहितला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये वगळण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट मालिका खेळणार आहे. दरम्यान रोहित शर्मासह वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यालाही संघात जागा देण्यात आली नाहीये. रोहित आणि इशांत यांना दुखापत झाल्यामुळे वगळण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

तर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत उपकर्णधार पदाची धुरा केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. रोहित आणि इशांत दुखापतीतून कधी सावरतील याकडे बीबीसीआय लक्ष ठेवून आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, आज केली वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी!

चंद्राच्या पृष्ठभागावर सापडलं पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांचा दावा

उद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही – कंगणा राणावत

“महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे मुख्यमंत्र्यांना कळणारही नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More