मुंबई | भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना भारताने गमावला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय टीमच्या फलंदाजांनी नाच्चकी झाली. भारतीय संघ अवघ्या 36 धावांमध्ये गारद झाला.
जॉस हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज टिकले नाहीत. दरम्यान 36 धावांमध्ये भारतीय संघाच्या 9 विकेट्स गेल्या. टीमच्या इंडियाच्या या खराब फलंदाजीमुळे 46 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे.
1974 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 42 धावांची निच्चांकी धावसंख्या केली होती. आता 46 वर्षांनंतर भारताने हा लाजीरवाणा विक्रम मोडलाय.
पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही.
थोडक्यात बातम्या-
“कृषी कायदा समजून घेणारे आणि कायद्याला पाठिंबा देणारे हेच खरे देशभक्त आहेत”
शिवसेनेचा ‘परळ ब्रँड’ पाच वेळा खासदार राहिलेले मोहन रावले याचं निधन
आता शिक्षकांनाही कोविड उपचारावरील खर्च मिळणार!
क्रूरतेचा कळस! रात्रीच्या अंधारात बैलाला गळफास देऊन बैलाची केली हत्या
पुत्र मोह सोडा, लोकशाहीला वाचवा- शिवानंद तिवारी