Team India l टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. अशातच काही दिवसांपूर्वी मोहम्मद शमीची शस्त्रक्रिया झाली होती. अशातच आता तो बरा देखील झाला आहे. 16 जूनला फादर्स डे निमित्त मोहम्मद शमीने वडिलांचा एक फोटो शेअर केला अन् फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या होता. मात्र सध्या सोशल मीडियावर केलेली पोस्ट तुफान चर्चेत आली आहे.
हसीन जहाँची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत :
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिने सोशल मीडिया पोस्ट करत शमीवर धक्कादायक आरोप केले आहेत. हसीन जहाँची इंस्टाग्राम पोस्ट देखील सध्या व्हायरल होत आहे. मोहम्मद शमीबद्दल हसीन जहाँने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, काही लोक इतके निस्वार्थ असतात.
या लोकांमध्ये माणुसकी आणि देवाचे भय का नाही? अल्लाच जाणो… स्त्रीकरणामुळे बापाला बापच मानला जात नाही आणि मग बिचाऱ्या बापाचा मृत्यू झाला की मग सगळेच फोटो सोशल मीडियावर टाकून कसे फसवतात… जे की तो स्वत:च्या बापासाठी काहीही करू शकला नाही, तो कसा समजणार वडिलांच्या वेदना? अशी खरमरीत टीका हसीन जहाँने केली आहे.
Team India l मोहम्मद शमी दुखापतीमुळे संघाच्या बाहेर :
मोहम्मद शमीच्या पत्नीने म्हणजेच हसीन जहाँने मार्च 2018 मध्ये घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने आपल्या तक्रारीत मोहम्मद शमीवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप देखील केला होता. तसेच मानसिक त्रास देत असल्याची तक्रार देखील करण्यात आली होती. तसेच मोहम्मद शमी सध्या पायाच्या दुखापतीमुळे बाहेर आहे.
शमीने आयपीएल 2024 चा एकही सामना खेळला नाही किंवा तो T20 विश्वचषकातील संघाचा भाग देखील नाही. मोहम्मद शमीचे 26 फेब्रुवारी रोजी पायाचे ऑपरेशन झाले होते. काही दिवसांपूर्वीच शमीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ट्रेनिंगचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये शमीने लिहिले होते की, दुखापतीने मला मैदानाबाहेर ठेवले आहे, पण ते मला फार काळ मागे ठेवणार नाही.
News Title – Team India Cricketer Mohammed Shami Post Father Day Haseen Jahan Angry Insta Story
महत्त्वाच्या बातम्या
पोलीस भरती पुढे ढकला; ‘या’ नवनिर्वाचित खासदाराची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आज बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये
उद्यापासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात; पाऊस आला तर काय होणार?
या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ संभवतो
राज्यात ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी