गोलंदाज विरुद्ध फलंदाज, भारताच्या खडतर सरावाचा व्हिडिओ

केपटाऊन | दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झालेल्या भारतीय संघाचा सराव सुरु झालाय. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलाय. 

विराट कोहलीच्या ब्रिगेडसाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला त्यांच्याच भूमीवर पराभूत करण्याची किमया विराट ब्रिगेडला करायचीय. त्यामुळे भारतीय संघ चांगलाच घाम गाळताना दिसतोय. 

दरम्यान, द.आफ्रिकेच्या भूमीवर भारतीय संघ 3 कसोटी, 6 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. 5 जानेवारीपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.