पुणे | विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. भारताने एक डाव आणि 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
सामन्यातील चौथ्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर आफ्रिकेला 189 धावांवर गुंडाळणे शक्य झाले. त्यामुळे भारताने एक डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला.
पहिला डाव भारताने 601/5 धावांवर घोषीत केला. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रीका संघ 275 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने 326 धावांची आघाडी घेतली होती.
दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही. आफ्रिकेला केवळ 189 धावांची मजल मारता आली. यावेळी उमेश यादवने 3 तर जडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 2 गडी बाद केेले.
महत्त्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्ही ५० हजार कोटींची कर्जमाफी दिली- देवेंद्र फडणवीस – https://t.co/FwMyI6XbfI @Dev_Fadnavis @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 13, 2019
लोकहो, 2014 ला तुम्ही ट्रेलर दाखवला आता यंदा पिक्चर दाखवा- नरेंद्र मोदी https://t.co/3DOjjRnnfC @narendramodi
— थोडक्यात (@thodkyaat) October 13, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीकडून फक्त ही दोन आश्वासनं द्यायची राहिली- देवेंद्र फडणवीस – https://t.co/KbT7q3fXfK @Dev_Fadnavis @NCPspeaks @INCIndia
— थोडक्यात (@thodkyaat) October 13, 2019
Comments are closed.