बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाप रे बाप! टीम इंडियाचा जबरा फॅन, वनडे सामना पाहण्यासाठी चक्क ‘या ठिकाणी’ जाऊन बसला

पुणे | वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेशास  बंदी घालण्यात आली आहे. मात्र टीम इंडियाचे आणि क्रिकेटचे फॅन असणारे काहीही उपाययोजना करतात आणि सामन्याचा आनंद घेतात. मात्र एका क्रिकेट चाहत्याने मैदानापासून दोन किमी असलेल्या डोंगरावर जाऊन भारताचे दोन्ही सामने पाहिले.

पुण्यात सुरु असलेल्या भारत इंग्लंड वनडे सामन्यादरम्यान काही प्रेक्षक स्टेडियमजवळील टेकडीवरून सामना पाहताना दिसले. याच प्रेक्षकांपैकी एक म्हणजे टीम इंडियाचे जबरा फॅन सुधीर कुमार गौतम. ते सचिन तेंडुलकरचे चाहते म्हणून ओळखले जातात. 2007 पासून ते भारताचा प्रत्येक सामना पाहतात. मॅचला पोहोचण्याअगोदर ते तिरंग्याचं निशाण आपल्या अंगावर रेखाटतात. तसेच मिस यू सचिन म्हणत त्यांच्या जर्सीचा नंबर ते आपल्या पाठीवर लिहितात. त्यांच्या एका हातात तिरंगा आणि दुसर्‍या हातात शंख असतो. अगदी याच वेशात ते पुण्यालाही आले होते.

सध्या कोरोनाच्या नियमांमुळे सुधीर मैदानात जाऊ शकले नाही. पण त्यांनी हार मानली नाही. मैदानापासून दोन किमी अंतरावर असलेल्या डोंगरावर जाऊन त्यांनी भारताचे दोन्ही सामने पाहिले. त्या डोंगरावर जाण्यासाठी त्यांना जंगलातून जावं लागलं होतं. जंगलात सापांचा सुळसुळाट आहे. पण क्रिकेटच्या वेडापायी कोणतीही परिस्थिती आली तरी त्यावर मात करुन सामन्याला हजेरी लावायची, त्यांनी हा आता निर्धार केला आहे.

दरम्यान, पुण्याच्या गहुंहजे क्रिकेट स्टेडिअमच्या जवळ घोरावडेश्वर डोंगर आहे. सिमेंटच्या चांगल्या रस्त्याने स्टेडियमपासून हा डोंगर जवळपास 4 किमी अंतरावर आहे. पण हे अंतर कमी करण्यासाठी सुधीर कुमार जंगलातल्या रस्त्याने गेले होते. घोरडेश्वराच्या टेकडीवर गेल्यानंतर सुधीर कुमार यांनी टीम इंडियासाठी शंख वाजवला. टीम इंडियाला प्रोत्साहित करण्यासाठी तिरंगा फडकावला. ‘जरी सामना इतक्या लांबून दिसत नसला तरी स्टेडियम दिसतं. हेच पाहून मी आनंदी होतो. क्रिकेट हा माझा श्वास आहे. जसा माणूस श्वासाशिवाय जगू शकत नाही. तसा मी क्रिकेटशिवाय जगू शकत नाही, असं सुधीर कुमार गौतम यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या

टीव्हीवर सामन्याचे प्रक्षेपण दोन ते अडीच सेकंड लेट, मग बुकींनी डोंगरच गाठला थेट!

अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण!

‘…तर मग मोदींनी सत्याग्रह कशासाठी केला?’; ‘या’ शिवसेना खासदाराची मोदींवर बोचरी टीका

“नरेेंद्र मोदीजी अजून किती फेकणार, आता हद्द झाली राव”

मनसुख हिरेनच्या पोस्टमार्टमपूर्वी सचिन वाझेंनी घेतली होती डाॅक्टरांची भेट; NIA च्या हाती लागली ‘ही’ माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More