बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नियती काळ बनून आली, एकाच कुटुंबातील 9 जणांचा करुण अंत, मालाड दुर्घटनेनं मुंबईच्या डोळ्यात पाणी!

मुंबई | मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात चार मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात ही दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.

रात्रभर शोधकार्य सुरू होते. या चाळीत राहणाऱ्या राफिक यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. राफिक यांच्यासह त्यांची पत्नी रईसा बानो आणि घरातील 6 चिमुरडे ढिगाराखाली सापडले. तर राफिक यांचा भाऊ आणि त्याची पत्नीसुद्धा ढिगाराखाली अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला. राफिक यांच्या कुटुंबातील 6 चिमुरड्यांचा यात मृत्यू झाला.

एकाच कुटुंबातील एकूण 9 जणांचा या दुर्घटनेमध्ये करुण अंत झाला. या संपूर्ण दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 9 जण हे राफिक यांच्या कुटुंबातील होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकाने मृतांसह गंभीर जखमींची यादी जाहीर केली आहे. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

थोडक्यात बातम्या- 

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची बातमी!

‘…म्हणून मी कर भरला नाही’; कंगणाने कर न भरण्याचं दिलं ‘हे’ कारण

“अन्यायकारक कायद्याची सर्वाधिक झळ महाराष्ट्राला; राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्राचा डाव”

लहान मुलांना कोरोना झालाय?; केंद्र सरकारच्या ‘या’ मार्गदर्शक सूचना नक्की वाचा…!

अखेर आयपीएलचा मुहूर्त ठरला; आयपीएलच्या तारखांबाबत बीसीसीआयची अधिकृत घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More