बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोनीची अफलातून फटकेबाजी पाहून चिमुकल्या चाहत्यांना अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

मुंबई | आयपीएलचा 14 वा हंगाम खूप रंगतदार झालेला पहायला मिळाला. काल या हंगामातला पहिला क्वालिफायर सामना झाला असून चेन्नई सुपरकिंग्सनं दिल्ली कॅपीटल्सवर शानदार विजय मिळवला. या सामन्यात कॅप्टन धोनीची चांगलीच जादू पहायला मिळाली. कॅप्टन कूलची जादू पाहून चाहत्यांनाही आनंदाश्रू अनावर झाले.

काल झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात महेद्रसिंग धोनीनं 6 बाॅलमध्ये 18 रनांची जोरदार खेळी केलेली पहायला मिळाली. बऱ्याच दिवसांनंतर धोनीची फटकेबाजी पाहून धोनी फॅन्सला अश्रू अनावर झाले. अशातच धोनीच्या एका चाहतीनं तर सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं.

धोनीची जोरदार खेळी पाहून मैदानात आलेले त्याचे चिमुकले चाहतेही रडू लागले. ‘यलो आर्मी’चे दोनही चाहते आपली टीम जिंकताना पाहून भावूक झाले आणि रडू लागले. सध्या सोशल मीडियावर या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायर होत आहेत.

दरम्यान, सीएसकेच्या विजयानंतर जेव्हा धोनीला समजलं की, त्याचा विजयी शॉट पाहून लहान मुलगी आणि तिचा भाऊ रडत होते. त्यावेळी माहीने सामन्याचा बॉल चिमुरडीला गीफ्ट म्हणून दिला. या घटनेमुळे पुन्हा एकदा सुद्ध झालं की ‘धोनी हे फक्त नाव नसून ते एक इमोशन आहे.’

 

थोडक्यात बातम्या –  

पेट्रोल डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशीही वाढ, वाचा आजचे ताजे दर

“भाजप नेते आणि त्यांचे अब्जाधीश मित्र यांच्याशिवाय देशात कुणीही सुरक्षित नाही”

धोकादायक! जास्त फळं खाल्यानं ‘या’ अवयवांवर होऊ शकतो परिणाम

मोठी बातमी! महाराष्ट्र बंदमुळे पुण्यातील PMPML प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

“लखीमपूरची चर्चा करूच पण इथल्या शेतकऱ्यांना मदत कधी देणार?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More