नवी दिल्ली | राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलत होते. त्यावेळी मोदी भावूक झाले आणि त्यांना अश्रु अनावर झाले.
राज्यसभेतील चार खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी बोलत होते. गुलाम नबी आझाद यांची नम्रता, देशाच्या उन्नतीची कामना त्यांना शांत बसू देणार नाही. देशाच्या विकासासाठी ते काम करत राहतील, असं म्हणत मोदींनी गुलाम नबी आझाद यांना सॅल्यूट केला.
गुलाम नबी आझाद यांची जागा घेणारा नेता त्यांची बरोबरी करु शकत नाही. कारण गुलाम नबी आझाद यांनी कधीही फक्त आपल्या पक्षाचा विचार केला नाही. त्यांनी सतत देशाच्या विकासाचा विचार केला असल्याचं मोदींनी म्हटलं.
दरम्यान, मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. तसंच केवळ पक्षच नाहीतर देशाच्या हिताला प्राधान्या देण्याऱ्या नेत्यांमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पहिल्या श्रेणीत पाहतो, असंही मोदी म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘त्या’ आत्महत्या केलेल्या तरुणीचे मंत्र्यासोबत प्रेमसंबंध?; पोलीस काय म्हणाले???
सरकार शोधतंय स्वयंसेवक करावी लागणार ‘ही’ कामं
‘या’ कारणामुळं अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी
आठवड्यात तीन सुट्ट्या?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
“दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले, सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले”