Pimpri-Chinchwad | पिंपरी-चिंचवड मधील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे. एका १७ वर्षीय मुलीवर २२ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. हा संपूर्ण प्रकार “ट्रुथ अँड डेअर” नावाचा खेळ खेळत असताना घडला.
या घटनेची क्रूरता इथेच थांबत नाही. अत्याचाराच्या वेळी पिडीतेचा फोन सुरू होता आणि तिच्या नात्यातील एका मुलाने हा सगळा प्रकार ऐकला. यानंतर त्याने तातडीने पीडितेच्या आई-वडिलांना याबद्दल कळवले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलीचा शोध घेऊन (Pimpri-Chinchwad) तिला पोलीस स्टेशनला नेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
इन्स्टाग्रामवरून झाली होती ओळख-
पिडीत मुलगी ही मूळची बाहेरगावची असून ती नीट (NEET) परीक्षेच्या तयारीसाठी पिंपरी (Pimpri) येथे भाड्याने राहत होती. पाच वर्षांपूर्वी तिची एका २२ वर्षीय तरुणीशी इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि दोघीही एकमेकींशी नियमित संपर्कात राहू लागल्या.
मंगळवारी (२१ जानेवारी) सदर तरुणीने पीडितेला फोन करून सांगितले की, तिला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. तिने पीडितेला विनंती केली की, तिला एक दिवसासाठी राहण्याची सोय करून द्यावी. पीडित मुलीने तिला तात्पुरता आपल्या रूमवर राहण्याची परवानगी दिली.
“ट्रुथ अँड डेअर”, दारू अन् काय घडलं?
मंगळवारी रात्री सदर तरुणी पीडितेच्या रूमवर (Pimpri-Chinchwad) आली. परंतु, मध्यरात्री तिला तिच्या मित्राचा फोन आला आणि ती त्याच्यासोबत रावेत (Ravet) येथील फ्लॅटवर गेली. तेथे तिचा मित्र आणि त्याचे दोन साथीदार दारू पित बसले होते. त्यांनी या तरुणीला देखील दारू पिण्यास भाग पाडले.
त्यानंतर त्या पाच जणांनी “ट्रुथ अँड डेअर” हा खेळ खेळण्यास सुरुवात केली. या खेळात जो हरतो त्याला समोरच्या व्यक्तीने सांगितलेले काम करावे लागते. दुर्दैवाने, पीडितेची मैत्रीण या खेळात हरली.
आधार देत बाथरूममध्ये नेले-
खेळ सुरू असतानाच पीडितेच्या मैत्रिणीला उलटी होऊ लागली. तिच्या मित्रांनी तिला आधार देत बाथरूममध्ये नेले. त्याच वेळी पीडित मुलगी दुसऱ्या बाथरूममध्ये गेली. दारूच्या नशेत असलेला पीडितेच्या मैत्रिणीचा मित्र तिच्या मागे गेला.
बाथरूममध्ये त्याने पीडितेवर बळजबरी केली. हा प्रकार सुरू असतानाच पीडितेच्या मोबाईलवरून तिच्या प्रियकराला फोन लागला होता. त्याने दोघांमधील झालेला सगळा संवाद ऐकला आणि त्याने पीडितेच्या आई वडिलांना कळवले. आई वडिलांनी तात्काळ रावेत (Ravet) पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.
News Title : Teen Assaulted in Pimpri-Chinchwad
Keywords: Crime, Assault, Alcohol, Truth and Dare, Minor, गुन्हा, हल्ला, दारू, ट्रुथ अँड डेअर, अल्पवयीन