ओल्सनच्या जिद्दीला सलाम, बनला व्हिलचेअर विम्बल्डनचा बादशाह

लंडन | रॉजर फेडरर आणि मरिन सिलिच यांच्यात पुरुष विम्बल्डनचा सामना रंगला असताना पुरुष व्हिलचेअरचं विम्बल्डन स्टीफन ओल्सननं पटकावलं.

स्टीफन ओल्सननं आपला प्रतिस्पर्धी गुस्ताओ फर्नांडिसचा ७-५, ३-६, ७-५ असा पराभव केला. अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात दोघांनीही विम्बल्डनचं जेतेपद जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठी केली. यात स्टीफननं बाजी मारली.

दरम्यान, स्टीफन ओल्सनचं हे पहिलंच जेतेपद आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या