बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तहसीलदार ज्योती देवरेंच्या अडचणीत वाढ, तब्बल ‘इतक्या’ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप!

पुणे | पारनेच्या तहसीलदार ज्योती देवरे एका ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत होत्या. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप देवरे यांनी केला होता. परंतु आता देवरे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्यावर 5 कोटी 64 लाख रूपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार अॅंड. असीम सरोदे यांनी मुंबई लोकायुक्तकडे दाखल केली आहे.

पदाचा गैरवापर करणे, लोकांची वाहने बेकायदेशीर पकडून त्यांना नाहक त्रास देणे. वाळूचे ठेके आणि त्यातून आलेला दंड सरकारकडे जमा न करणे, असे गंभीर आरोप सरोदे यांनी देवरेंवर केले आहेत.

देवरे दोषी असतील तर त्यांना लोकायुक्त चौकशीसाठी बोलवतील, या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करावी. तसेच त्या धुळे येथे त्यांनी तहसीलदार पदाचा गैरवापर केला होता, असं सरोदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वाळू लिलाव संदर्भात बोलताना 100 ब्रासचा वाळू लिलाव होत असताना प्रातांधिकाऱ्यांचा फोन आला. तेव्हा तो लिलाव झाला नाही तो लिलाव शासकीय कंत्राटदारांसाठी तसाच राखुन ठेवला होता. संबंधित कॉन्ट्रॅक्टरने तो घेतला नाही आणि त्याची पुढे कारवाईही झाली नाही. त्यामुळे महसुलाचं तोटा ही झाला नव्हता, असं ज्योती देवरे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

“ताई…मुलींबद्दल सहानुभूती बाळगावी, चूक मान्य केल्यानं कोणी लहान होत नाही”

बाबो! विमानतळावर जिन्सला पिवळा रंग लावून, तपासणी केल्यानंतर दिसलं ते पाहून पोलिसही झाले हैराण!

ऑलिम्पिकनंतर पॅरालिम्पिकमध्येही भारताला भालाफेकमध्ये सुवर्ण, सुमित अंतिलने रचला इतिहास!

काय सांगता! हवेत तरंगतोय पिझ्झा?, व्हिडीओ तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More