..अखेर तेजस ठाकरेंना मिळाली खेकडे गोळा करण्यास परवानगी!

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे द्वितीय चिरंजीव तेजस ठाकरे यांना खेकडे गोळा करण्याची परवानगी मिळाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंंय. 

सह्याद्री अथितीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ही परवानगी देण्यात आली. संशोधन करण्यासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे.

तेजस ठाकरे यांनी खेकड्यांच्या काही प्रजाती शोधल्या आहेत. त्यापैकी एका प्रजातीला चक्क ठाकरे कुटुंबियांचं नावही देण्यात आलंय.