मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाट, सह्याद्रीच्या पर्वतरांगांत केलेल्या संशोधनानंतर आता मेघालयातही महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे.
मेघालयातील खासी टेकडय़ांतून तेजस ठाकरे यांच्या टीमने अत्यंत सुंदर आणि तितकाच दुर्मिळ असा ‘चन्ना स्नेकहेड’ हा मासा शोधला आहे. चन्ना स्नेकहेड या प्रजातीला ऑरिस्टॉन एम. रेंडॉन्गसंगी यांचं नाव देणार असल्याचं तेजस ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तेजस ठाकरे यांच्या या संशोधनाची दखल अमेरिकेतील ‘कोपिया- अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अॅण्ड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल’ने घेतली आहे. या जर्नलमध्ये त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.
तेजस ठाकरे यांनी आतापर्यंत 11 दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावला आहे. ज्यात खेकडा, पाली आणि इतर वन्यजीवनांचा समावेश आहे.
थोडक्यात बातम्या-
“राहुल गांधींची मेहनत वाखणण्याजोगी पण कुठेतरी ते कमी पडतायत”
ईडी दाखवली तर आता सीडीही निघणार; अमोल मिटकरींचा इशारा
…आता महाविकास आघाडीची झोप उडवणार- आशिष शेलार
मला अद्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही, आल्यावर बोलेन- एकनाथ खडसे
मनसेच्या खळखट्याकनंतर अॅमेझॉनची माघार; सात दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार