मुंबई | ‘केसरी’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक सुजय डहाकेने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीबद्दल भाष्य केलं होतं. सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात, असं म्हणत त्याने चित्रपटसृष्टीतील जातीयवादावर बोट ठेवलं होतं.
डहाकेने केलेल्या व्या वक्तव्यावरुन अनेक स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं डहाकेचं नाव न घेता त्याला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
मी ब्राह्मण नाहीये बरं! सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्ष माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?, अशा मजकुराची पोस्ट तेजश्रीने आपल्या फेसबुक वाॅलवर पोस्ट केली आहे. तिने अप्रत्यक्षपणे डहाकेला लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, मुलाखतीत बोलताना डहाकेने मराठी चित्रपटसृष्टी जातीयवादाने कशी पोखरली आहे याबाबत भाष्य केलं होतं. मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही? असा सवाल त्याने केला होता.
ट्रेंडिंग बातम्या-
पाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज आज माफ झाले; बच्चू कडूंनी शेअर केला व्हिडीओ
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी रामदेव बाबांकडे रामबाण उपाय?
महत्वाच्या बातम्या-
मोदींच्या पाठोपाठ केजरीवालही खेळणार नाहीत होळी!
भारतीय क्रिकेट संघाला लॉटरी; इतिहासात पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम
तुझं आयुष्य उद्धवस्त करु; विद्या चव्हाणांच्या सुनेला धमकी
Comments are closed.