‘मी दु:खी होऊन बसत नाही,मी…’; तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मुंबई | मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानने (Tejashri Pradhan) तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. तेजश्री प्रधान तिच्या कामामुळे चर्चेच असते. त्याचप्रमाणे तेजश्रीचं खासगी आयुष्य देखील अनेकदा चर्चेचा विषय ठरलं आहे.
तेजश्री प्रधान सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. फोटो शेअर करताना तेजश्रीने दिलेल्या कॅप्शनमुळे ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. तेजश्रीचा रोख नेमका कोणाकडे आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
मी दु:खी होऊन बसत नाही आणि कोणाला माझ्यासोबत चुकीचं वागुही देत नाही. माझ्यात लढा देण्याची ताकद आहे. व्यावस्थेची बळी मी पडणार नाही, अन्याय सहन करणं माझ्या रक्तात नाही. आयुष्य कसं आहे हे ठाऊक असलं की यश मिळवणं सोप्प जातं, असं कॅप्शन तेजश्रीने तिच्या पोस्टला दिलं आहे.
दरम्यान, तेजश्रीने ही पोस्ट नेमकं कोणाला उद्देशून लिहिली आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. होणार सून मी ह्या घरची मालिकेतून तेजश्री घराघरात पोहोचली. त्यानंतर तेजश्रीने मराठी मालिका ते हिंदी चित्रपट असा प्रवास केला आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
‘महाविकास आघाडी सरकार पडलं की…’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
“आम्ही आणखी लढू, कधी ना कधी यश येईल”
ऐतिहासिक विजयानंतर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पाच राज्यातील निकालानंतर भाजपची मोठी घोषणा! आता मुंबई…
2022 मधील निकालांनी 2024 मधील भविष्य निश्चित केलंय – पंतप्रधान नरेंद्र मोदी
Comments are closed.