पाटणा | मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अपत्यांच्या संख्येवरुन नाव न घेता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला होता. याला राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी प्रत्युत्तर दिलंय.
नितीश यांच्या या वक्तव्यानंतर लोक म्हणत होते की नितीश कुमार यांनी मुलगी होईल या भीतीने दुसरं अपत्य होऊ दिलं नाही, पण मी प्रचारात तसं म्हणालो नाही. इतक्या अनुभवी मुख्यमंत्र्याला माझ्या बहिणींना राजकारणात ओढणं शोभत नाही, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलंय.
मी निवडणूक प्रचारात मी त्यांना केवळ याचीच आठवण करुन दिली की माझ्या आई-वडिलांचं सर्वात लहान अपत्य ही मुलगी आहे, असं तेजस्वी यादव यांनी सांगितलं.
मी जन्मदरावर बोलताना विनोदाने तसं बोललो. मी तसं बोलताना कुणाचंही नाव घेतलं नाही. लोक तर उगाच स्वतःवर ओढून घेत आहेत, असं नितीश कुमार यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट रद्द!
“महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय”
“तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही
राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारचा निर्णय
“गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं”