देश

“बिहारच्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन”

पाटणा | बिहारच्या तरुणांना 10 लाख नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडल्यास मी मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन. पण तरुणांना नोकऱ्या नक्की देईन, असं आश्वासन राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी दिलंय.

बिहारमध्ये बेरोजगारीची टक्केवारी 46.68 टक्के इतकी आहे. त्यामुळे लोक पैसा खर्च करत नाहीत. लोकांची क्रयशक्ती कमी पडत असल्यामुळेच बिहार राज्य मागास राहिल्याचं तेजस्वी यादव यांनी सांगितलं.

परराज्यात काम करणाऱ्या 40 लाख मजुरांसाठी प्रत्येक राज्यात कर्पुरी श्रम केंद्रांची स्थापना केली जाईल. तसेच उद्योगधंद्याशी संबंधित लोकांच्या सुरक्षेसाठी बिहारमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था निर्माण केली जाईल, असंही तेजस्वी यादव यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी कमाई, शिक्षण आणि औषधे या त्रिसूत्रीवर भर दिला आहे. या सर्व सोयी राज्यात उपलब्ध करून दिल्या जातील, असं सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

…तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील

‘आता तुम्हीच मार्ग काढा’; मराठा आंदोलक शरद पवारांची घेणार भेट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे- राजेश टोपे

‘कोणाच्या जिवावर माज करतात’; प्राजक्ता गायकवाडवर अलका कुबल भडकल्या

“…तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या