पुणे महाराष्ट्र

‘विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं’; तेजस्वी यादव यांचा खळबळजनक आरोप

पाटणा | राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी खळबळजमक आरोप केला आहे. विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेवर दबाव टाकत असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. यानंतर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं एक शिष्ट मंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहचलं आहे.

मतमोजणी पूर्ण झालेल्या 119 जागांचे निकाल हाती आले आहेत. ज्या ठिकाणी महाआघाडीचे उमेदवार जिंकले आहेत तिथे त्यांना विजयाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. मात्र आता त्यांना सांगण्यात येतं आहे की तुम्ही हरले आहात, असं तेजस्वी यादव यांनी सांगितलं आहे.

इलेक्शन कमिशनच्या वेबसाइटवर महाआघाडीच्या या उमेदवारांना विजयी दाखवण्यात आलं आहे. मात्र त्यांना प्रमाणपत्र नाकारण्यात येतं आहे आणि हे सांगितलं जातं आहे की तुमचा पराजय झाला. लोकशाही ही अशी लूट चालणार नाही, असं तेजस्वी यादव म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांची चिंता व्यक्त केली हे चांगलं आहे, पण…- शरद पवार

“फडणवीसांनी बिहार आणलं, आता महाराष्ट्राला पण देवेंद्र फडणवीसच पाहिजे”

संजय राऊतांचा गजनी झालाय, ते पराभव विसरतात- निलेश राणे

दुधात साखर विरघळावी तसं ज्योतिरादित्य भाजपमध्ये विरघळले- शिवराज सिंह चौहान

शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा लव सिन्हाला पराभवाचा धक्का!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या