नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपन आपली सत्ता टिकवली. बिहारमध्ये या सरकारला येऊन एत महिना नाही झाला तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
माझी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी मला पूर्ण अधिकार दिले आहेत. तुम्हीही हे विसरून चालणार नाही आणि सक्रिय राहा. सगळ्यांनी पूर्ण तयारीनिशी राहावं, पुढील वर्षी पुन्हा निवडणूक होऊ शकते., असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.
तेजस्वी यादवांनी काल सोमवारी बिहार विधानसभा निवडणूक निकालाची आढावा बैठक बोलावली होती. त्यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांशी तो बोलत होते. आपल्या पदाधिकाऱ्यंना तयारीनिशी राहण्याचं यादव यांनी सांगितलं.
दरम्यान, जुन्या परंपरेत आता बदल करण्याची गरज आहे. आढावा घेऊन हे बदल केले जातील. आपले अनेक उमेदवार पक्षातूनच झालेल्या बंडामुळे पराभूत झाले आहेत. असं करून कुणालाही फायदा होत नाही. पक्षात राहूल पक्षविरोधी काम करणं चांगलं नसल्याचं यादव म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
…अशा देशात आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही- अण्णा हजारे
“गद्दार राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही
कुत्र्याच्या साखळीने गळा आवळला; हत्येचं कारण ऐकून सुन्न व्हाल!
‘…त्या वेळी तुम्ही काय करणार? कुठं तोंड लपविणार?’; गुरूवाणीचा अर्थ सांगत मोदींवर निशाणा
“कोरोनाने सांगितलं आहे का मी दिवसा झोपेल आणि रात्री बाहेर येईल”