‘महाराष्ट्र हरलास तू…’, तेजस्विनी पंडीतने राज ठाकरेंसाठी केलेली ‘ती’ पोस्ट तूफान व्हायरल!

tejaswini pandit

Tejaswini Pandit | विधानसभा निवडणुकीचा निकाल जनेते पुढे स्पष्ट झालाय. 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागांवर यश मिळालं. तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे मनसेचा दारुण पराभाव झाल्याचं चित्र समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने आपल्या अधिकृत X अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर आपली राजकीय मतं बिनधास्तपणे मांडत असते. काल समोर आलेल्या विधानसभा निकालावर देखील तेजस्विनीने आपलं मत मांडलं आहे. मनसेचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर तेजस्विनीने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने ‘महाराष्ट्र हरलास तू…’ असं लिहिलं आहे. दरम्यान, तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरी सुद्धा कमेंट करत आहेत.

व्हायरल पोस्ट-

शेअर केलेल्या पोस्टमध्ये तेजस्विनीने (Tejaswini Pandit) म्हटलं आहे की, विजयी उमेदवारांचं अभिनंदन ! कोण? कसं ? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल, “त्यांच्या micro management ला 100/100 , पण तरीही राजसाहेब ठाकरे, आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू…”, असं म्हणत अभिनेत्री #एकनिष्ठ #सदैवसोबत अशा हॅशटॅगचा देखील पोस्टमध्ये वापर केला आहे.

News Title : tejaswini pandit shares a post on X

महत्त्वाच्या बातम्या-

“आयुष्यात छान गोष्ट घडली…”, प्राजक्ताने व्हिडीओ शेअर करत दिली गूड न्यूज

महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाची स्थापना होणार? कोण करणार

‘हा’ खेळाडू ठरला आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू!

महायुतीतील 6 नेत्यांना मिळणार विधानपरिषदेची संधी, कोणाला लागणार लॉटरी?

निकालानंतर ‘या’ मोठ्या पदावर अजित पवारांची नियुक्ती!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .