‘इतका निस्वार्थी भावना असणारा’; तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट

Tejaswini Pandit | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (14 जून) वाढदिवस आहे. राजकीय तसेच इतर क्षेत्रातून दिग्गजांनी राज ठाकरे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी कलाकार मंडळींनी देखील राज ठाकरेंना खास पोस्ट लिहित शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हीने पोस्ट लिहीत राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यासोबतच अभिनेता सिद्धार्थ जाधव, दिग्दर्शक विजू माने यांनी देखील सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तेजस्विनी पंडितची पोस्ट

तेजस्विनीने राज ठाकरेंबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने “राजसाहेब, हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा. इतका निस्वार्थी भावना असणारा आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता!”, असं कॅप्शन दिलं आहे.

तसंच पुढे तिने लिहिलं की, “साहेब तुमच्या राजकारणाविषयी , तुम्ही घेतलेल्या भूमिकांविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेण-देण पण नाही, किंबहुना “तुम्हाला जाणलेल्या” कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे. तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत राहा. आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे. मनासारखा राजा आणि राजासारखं मन! हसत राहा साहेब, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”, अशा शब्दात तेजस्विनीने (Tejaswini Pandit) राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरेंना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा

तेजस्विनीची (Tejaswini Pandit) ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. तिच्या चाहत्यांकडून देखील त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. “खरा नायक! माननीय राज साहेब ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”, “राज साहेबांमध्ये बाळासाहेबांचा भास होतो”, “तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र विराजमान होवो! आदरणीय राजसाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा”, अशा प्रतिक्रिया चाहते नोंदवत आहेत.

News Title- Tejaswini Pandit Special Post For Raj Thackeray

महत्त्वाच्या बातम्या-

रिमझिम पावसात लोणावळ्याला जायचा प्लॅन करताय?, मग ‘या’ 17 ठिकाणांना नक्की भेट द्या

पंतप्रधानांना किस करतानाचा मेलोनी यांचा व्हिडीओ व्हायरल!

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार?, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

‘अहंकारी झाले त्यांना प्रभू श्रीरामाने…’; आरएसएसची भाजपवर बोचरी टीका

“RSS नं ठरवलं तर मोदी सरकार 15 मिनिटंही राहणार नाही”