मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून धूर निघाल्याने खळबळ

Photo- Pixabay

हैदराबाद | तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हेलिकॉप्टरमधून धूर निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

मुख्यमंत्री करीमनगर जिल्ह्यातून प्रवासाला सुरुवात करण्याच्या काही मिनिटे आगोदर हा प्रकार घडला. दूरध्वनी संचातून हा धूर येत होता अशी माहिती आहे. 

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली हेलिकॉप्टर दुर्घटना ताजी असताना तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून धूर निघाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.