Wedding Heart Attack l तेलंगणाच्या (Telangana) कामारेड्डी (Kamareddy) जिल्ह्यातील बिकानूरमध्ये (Bikanur) एका लग्नघरावर अचानक शोककळा पसरली. मुलीच्या लग्नातील विधी पूर्ण केल्यानंतर तिच्या वडिलांना हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वधू आणि वर पक्षाकडील नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
लग्नाच्या विधीदरम्यान घडली घटना :
बिकानूरमधील (Bikanur) रामेश्वरपल्ली (Rameshwarpally) गावात राहणाऱ्या बालचंद्रम (Balchandram) यांच्या मुलीचा विवाह सोहळा बीटीएस चौकातील एका सभागृहात आयोजित करण्यात आला होता. लग्नाचे विधी सुरू असताना, बालचंद्रम (Balchandram) यांनी मुलीचे पाय धुतले आणि काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला. यातच त्यांचे निधन झाले.
Wedding Heart Attack l रुग्णालयात केले मृत घोषित :
लग्न मंडपात उपस्थित नातेवाईक आणि आप्तेष्टांनी बालचंद्रम (Balchandram) यांना तातडीने कामारेड्डीतील (Kamareddy) एका रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे आनंदाच्या वातावरणात दु:ख पसरले. बालचंद्रम (Balchandram) यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मुलीचे लग्न पाहण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.
मध्य प्रदेशातही (Madhya Pradesh) अशीच घटना :
काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) श्योपूरमध्ये (Sheopur) अशीच एक हृदयद्रावक घटना घडली होती. लग्न मंडपात वरात घेऊन पोहोचलेल्या नवरदेवाचा मृत्यू झाला. नवरदेव घोड्यावर बसलेला असतानाच त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणातच त्याने मान टाकली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सायलेंट अटॅकमुळे (Silent Attack) नवरदेवाचा मृत्यू झाला.
ही घटना गेल्या आठवड्यात शुक्रवारी घडली. श्योपूरच्या (Sheopur) पाली रोड परिसरातील जाट हॉस्टेलमध्ये (Jat Hostel) लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वरात उत्साहात लग्नस्थळी पोहोचली. नवरदेव प्रदीप जाट (Pradeep Jat) घोड्यावर बसून स्टेजच्या दिशेने जात असताना त्याची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.