Telecom Industry BSNL | टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने गेल्या तीन महिन्यात नवा विक्रम केला आहे. बीएसएनएलने एका महिन्यात जवळपास 50-60 लाख ग्राहकांची वृद्धी करण्याचा इतिहास रचला आहे. इतकंच नाही तर कंपनी आता लवकरच 6G सेवेच्या तयारीत असल्याची देखील चर्चा आहे. यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांचं टेंशन चांगलंच वाढलंय. (Telecom Industry BSNL)
जुलै महिन्यात खासगी कंपन्या जसे जिओ, वोडाफोन आणि एअरटेल सारख्या कंपन्यांनी त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये मोठी वाढ केली. यामुळे कॉलिंग, डेटा प्लॅन महागले. त्यानंतर देशात बॉयकॉटची एकच लाट उसळली होती. ग्राहकांनी सोशल मीडियावर हॅशटॅग मोहिम राबवत बीएसएनएलकडे आपला मोर्चा वळवला. या काळात बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये मोठी वाढ दिसून आली.
5G सोबतच 6G ची चर्चा
अनेकांनी नेटवर्क सेवा बीएसएनएलमध्ये कन्व्हर्ट करून घेतली. गेल्या तीन महिन्यात बीएसएनएलच्या ग्राहक संख्येत 60 लाखांची भर पडली आहे. भारत दूरसंचार निगम लिमिटेडकडून सेवा गावागावात पोहचवण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. तसेच, जिथे नेटवर्कबद्दल तक्रारी असतील तिथे सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटले गेले. (Telecom Industry BSNL)
गेल्या वर्षी केंद्र सरकारने बीएसएनएलमध्ये सुधारणेसाठी 4जी आणि 5जी सेवांसाठी 89,047 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. कंपनीने या काही महिन्यात मोठे बदल केले आहेत. आता कंपनी 5G च नाही तर 6G साठीची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
5G सेवा सुरू होण्याची प्रतिक्षा असतानाच सरकार 6G सेवेसाठी पण चाचपणी करत असल्याचं बोललं जातंय.ज्योतिरादित्य शिंदे यांनी याविषयीची माहिती दिली. जगभरात 6G तंत्रज्ञान विकसीत होत असताना आपण मागे राहून चालणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात बीएसएनएलच्या ग्राहकांना मोठी खुशखबरी मिळण्याची शक्यता आहे. (Telecom Industry BSNL)
News Title : Telecom Industry BSNL preparation for 6G service
महत्वाच्या बातम्या-
‘दाना’ चक्रीवादळामुळे 56 टीम्स हाय अलर्टवर; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
भुजबळ बंडखोरीवर ठाम, नांदगावमध्ये महायुतीचं टेंशन वाढणार?
पुण्यात घडली दुर्दैवी घटना! तीन जणांचा जागीच मृत्यू
AB फॉर्म म्हणजे नेमकं असतं तरी काय?, निवडणुकीत याला इतकं महत्व का?
‘या’ मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना; पाहा कुणाचं पारडं भारी?