बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पराभूतसम्राट सांगे लोकांना, शेंबुड त्याच्याच नाकाला’; रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल

मुंबई | भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात शाब्दिक चकमक पहायला मिळाली. अशातच त्यांच्या या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी उडी घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील ठोंबरे यांनी ट्विट करत निलेश राणेंवर निशाणा साधला आहे. वडिलांच्या खांद्यावर बसूनही अजित पवार यांच्या नाकापर्यंत उंची भरणार नाही, असा खोचक टोला रुपाली ठोंबरे यांनी निलेश राणेंना लगावला आहे.

पुढे रुपाली ठोंबरे म्हणाल्या, पराभूतसम्राट सांगे लोकांना, शेंबुड त्याच्याच नाकाला. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातील वातावरण तापल्यांचं पहायला मिळतंय.

दरम्यान, अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर, अशी जहरी टीका निलेश राणेंनी अजित पवारांवर केली होती यालाच प्रत्युत्तर देत रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

Corona: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

“…तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म”; भास्कर जाधव कडाडले

पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ भागात अलर्ट जारी

‘तिसरी लाट आलीच तर ती…’; Omicron बाबत दिलासादायक माहिती समोर

“उद्धव ठाकरे आजारी आहेत तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More