पुणे | मी काय गुन्हा केला तो पक्षाने सांगावा, असा सवाल भाजपचे नेते एकनाथ खडसेंनी पक्षाला केला आहे. डाॅ. सुधाकराव जाधवर संस्थेतर्फे आयोजित युवा संसदेमध्ये ते बोलत होते.
या काळात संघर्ष करीत मी पारदर्शी कारभार केला. तरीही मला भ्रष्टाचारी ठरविले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते खरे की खोटे हे कोणी पाहत नाही, असंही ते त्यावेळी म्हणाले.
गुन्हेगारी विरोधात लढूनही माझे दाऊदच्या बायकोशी संभाषण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या सर्व गोष्टी मी वारंवार बोलून दाखविणार आहे, असंही खडसे म्हणाले.
दरम्यान, आश्वासन न पाळण्यासाठीचं दिले जाते असं राजकारण्यांबाबत लोकांचं मत झालं आहे, असंही खडसें म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-“…तर ‘त्यांच्या’ विरोधात वंचित बहुजन आघाडीचा कुणीही उमेदवार नसेल”
–पंतप्रधान मोदी सुर्यासारखे तर शरद पवार हे शकुनी मामा- पुनम महाजन
–… तर ‘त्या’ दिवशी शरद पवार पंतप्रधान होतील- देवेंद्र फडणवीस
–पंतप्रधान मोदी राजकारणातून निवृत्त झाल्यास मी पण राजकारण सोडेन- स्मृती इराणी
–“गाय एक जनावर आहे तिला माता म्हणणाऱ्यांच्या डोक्यात शेण भरलंय!”