बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अरे देवा! मंदिरात जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीत कोरोनाही चिरडुन गेला, पाहा व्हिडीओ

भोपाळ | देशातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना केंद्र सरकारने अनेक निर्बंध देशभरात लागु केले होते. त्यातच देशभरातील अनेक धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालं. परंतु, आता कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

सध्या मध्य प्रदेशच्या महाकालेश्वर मंदीरातील गर्दीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये मंदिरात प्रवेश करण्यासाठी नागरिक कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत असल्याचं दिसुन येत आहे. सदरील व्हिडीओ हा उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातील असल्याची माहिती समोर येत आहे.

व्हिडीओमध्ये पुरूष व महिला एकत्रित मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी चेंगराचेंगरी करत असल्याचं दिसुन येत आहे. तसेच या सर्व घटनेत कोरोना व्हायरस चेिरडून गेला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सुरक्षा रक्षक नागरिकांना रोखत असताना बॅरिकेट तोडुन लोेक मंदिरात प्रवेश करण्यासाठी धडपड करत आहेत.

विशेष म्हणजे या मंदिरात दर्शनासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चाैहान यांच्यासह उमा भारती यादेखिल उपस्थित असल्याचं समजतंय. दरम्यान, कोरोना महामारीचं संकट पुर्णपणे टळलं नसताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने कोरोना संसंर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या

पुणे रेल्वे स्थानकाला आज 96 वर्ष पूर्ण!

पेट्रोल डिझेलची कटकट संपणार; आता कोंबड्यापासून तयार होणार बायोडिझेल

राज कुंद्राची अटक बेकायदेशीर?; न्यायालयात दाखल 2 याचिकांवर आज होणार सुनावणी

कर्जबुडव्या विजय माल्ल्याला ब्रिटिश कोर्टाचा दणका!

खासदार सुजय विखे पाटील यांना मोठा धक्का; ठाकरे सरकारची ‘ही’ मोठी कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More