बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑक्सिजन न मिळाल्याने एका तासात 10 रूग्णांचा मृत्यु; ‘या’ शहरातील धक्कादायक घटना

पालघर |  कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडू लागल्या आहेत. राज्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. या अपुऱ्या आरोग्य साधनांमुळे लोकांना जीव गमवावा लागत असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना पालघरच्या नालासोपारा मध्ये घडली आहे.

ऑक्सिजन न मिळाल्याने एक तासात तब्बल 7 रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नालासोपारामधील विनायक रुग्णालयात हा प्रकार घडला. विनायक रुग्णालय आणि रिद्धीविनायक रुग्णालय या दोन्ही रुग्णालयामध्ये सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ऑक्सिजन साठा संपला. परिणामी या दोन्ही रुग्णालयामध्ये एका तासात 10 रुग्णांचा जीव गेला. या प्रकारानंतर रूग्णालयात असलेल्या इतर रूग्णांमध्ये भितीचं वातावरण होतं.

झालेल्या प्रकारानंतर मृतांच्या नातेवाईकानी या घटनेवर संताप व्यक्त करत रुग्णालयात गोंधळ घातला. नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. हे सर्व रुग्ण अस्वस्थ होते त्यामुळे यांचा मृत्यू झाला आहे, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. या प्रकरणीची चौकशी होऊन कारवाई होईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ठाण्यात रविवारी ऑक्सिजनचा साठा संपल्यामुळे तब्बल 26 रुग्णांना पार्किंग प्लाझा कोविड सेंटर मधून ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तर काही रुग्णांना उपचारासाठी बेड देखील मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना जमिनीवर बसून उपचार घेण्याची वेळ आली आहे.

थोडक्यात बातम्या-

अर्धशतक केलं दीपक हुडाने पण ट्रोल होतोय कृणाल पांड्या

थरारक सामन्यात अखेर पंजाब किंग्ज विजयी; संजू सॅमसनची तुफानी खेळी

पुण्यात कोरोना आटोक्यात?; दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिलासा, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

संभाजी भिडे यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More