…म्हणून ‘या’ टेनिसपटूला आपल्या एक्स गर्लफ्रेंडला दरमहा द्यावे लागणार दीड लाख रूपये
मुंबई | अभिनेत्री रिया पिल्लईने घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये तक्रार दाखल केली होती. रिया पिल्लईचा लिव्ह इन पार्टनर टेनिस स्टार लिअँडर पेसविरोधात केलेल्या तक्रारीसंदर्भात मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयाने पेसला दोषी ठरवले आहे. पेसने रिया पिल्लईवर केलेल्या घरगुती हिंसाचाराचे पुरावे असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.
टेनिसपटू लिअँडर पेसल याला अभिनेत्री रियाला प्रत्येक महिन्याला दि़ड लाख रूपये द्यावे लागणार आहेत. यामध्ये 50 हजार घरभाडे आणि 1 लाख रूपये प्रत्येक महिन्याच्या खर्चासाठी द्यावे लागणार आहेत. लिअँडर पेसची टेनिस कारकिर्द जवळपास संपुष्टात येत आहे. या परिस्थितीमध्ये पिल्लईच्या घरभाडे आणि खर्चाचे पैसे देणं लिअँडरसाठी भेदभाव ठरेल, असं मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोमल सिंग राजपूत यांनी म्हटलं आहे.
अभिनेत्री रिया पिल्लईने 2014 साली न्यायालयात धाव घेतली होती. रिया पिल्लई आठ वर्षांपासून पेससोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. पेसचे वागणे अत्यंत वाईट असल्यामुळे मोठा मानसिक आघात झाल्याचं रिया पिल्लईने म्हटलं आहे. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोमल सिंग राजपूत यांनी महिन्याच्या सुरूवातीला हे आदेश दिले होते. मात्र, बुधवारी त्याची प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, रिया पिल्लईने 2004 मध्ये लिअँडर पेसला डेट करायला सुरू केलं होतं. यापूर्वी रियाचा संजय दत्तसोबत विवाह झाला होता. रियाने संजय दत्तला घटस्फोट न देता पेसला डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर रियाने संजय दत्तला घटस्फोट दिला होता. पेसविरोधात रियाने घरगुती हिंसाचाराचे आरोप केल्याने पेसला प्रत्येक महिन्याला दिड लाखरूपये द्यावे लागणार आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘मला काम मिळत नव्हतं म्हणून मी…’, पूनम पांडेने कबूल केली ‘ती’ मोठी चूक
मराठी भाषादिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा, आता अमित ठाकरे…
डोळ्यांचा पांढरा भाग लाल होत असेल तर दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी राणे पिता पुत्रांना मोठा झटका
सुरू करा हा व्यवसाय अन् महिन्याला कमवा 3 लाख रूपये
Comments are closed.