सानिया मिर्झा दुसऱ्यांदा लग्न करणार?; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Sania Mirza | टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) नुकतीच पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून विभक्त झाली आहे. यानंतर सानिया दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची सतत चर्चा होती. सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने शोएब मलिकसोबत काडीमोड घेतल्यानंतर ती पुन्हा लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सानियाने मात्र दुसऱ्या लग्नाच्या चर्चांवर भाष्य करण नेहमीच नाकारलं आहे. सध्या तिचं नाव मोहम्मद शमीशी जोडलं जात आहे. दोघेही लवकरच निकाह करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या निकाहाची तारीखही लीक झाल्याचं बोललं जात आहे. 20 ऑगस्टला दोघेही निकाह करू शकतात, असा दावा व्हायरल पोस्टमधून केला जात आहे.

टेनिसस्टार सानिया मिर्झा दुसऱ्यांदा लग्न करणार

दरम्यान, मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा या दोघांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या अफवांमध्ये कितपत तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट सांगता येणार नाही. मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाकडून याबाबत कोणत्याही प्रकारचे अपडेट देण्यात आलेले नाहीत. तसेच याबाबत कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Sania Mirza | सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

मोहम्मद शमी हा टीम इंडियाच्या शक्तिशाली क्रिकेटपटूंपैकी एक आहे तर सानिया मिर्झा ही भारतीय टेनिसच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. दोघेही आपापल्या खेळात तज्ञ आहेत आणि त्यांचा आदर केला जातो

दोन्ही खेळाडूंचं वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत राहिलं आहे. शमीचं त्याची पत्नी हसीन जहाँसोबत अनेक दिवसांपासून भांडण सुरू आहे, तर अलीकडेच सानिया मिर्झाने (Sania Mirza) पाकिस्तानी क्रिकेटर पती शोएब मलिकपासून घटस्फोट घेतला आहे.

दरम्यान, लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी मोठा खुलासा केलाय. लग्नाच्या अफवांमध्ये तथ्य नाही. हे सर्व बकवास आहे. ती त्याला भेटलीही नाही, असं सानिया मिर्झाचे वडील इम्रान यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सानिया मिर्झाचा एक्स नवरा शोएब मलिकने केली मोठी घोषणा; म्हणाला, “पुन्हा एकदा..”

अमिताभ बच्चन यांचे सून ऐश्वर्याशी अजूनही पटत नाही?; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण

बच्चू कडूंच्या जीवाला धोका; अत्यंत धक्कादायक माहिती समोर

“आरक्षण दिलं नाहीतर तुम्हाला संपवणार…”, मनोज जरांगे संतापले

महायुतीत अजित पवारांना एकटं पाडण्याचा डाव?, नाशकात शिंदेंच्या सेनेला झुकतं माप